आपला जिल्हा

Coronavirus: बीड जिल्ह्यातील पाच शहरात अॅन्टीजन टेस्टमध्ये सापडले 230 रुग्ण

बीड — जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये व्यापाऱ्यांची अॅन्टिजन टेस्ट मंगळवारपासून करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दोनशे दहा रुग्ण सापडल्यानंतर बुधवारी पुन्हा 230 रुग्ण नव्याने सापडले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 105 रुग्ण परळी शहरांमध्ये आढळून आले.


जिल्ह्यातील कोरोना विषाणू ची संक्रमण साखळी तोडण्यासाठी. बीड गेवराई नंतर
केज, अंबाजोगाई, माजलगाव ,आष्टी आणि परळी या 5 शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांची अॅन्टीजन टेस्ट 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. आज बुधवारी तपासणीच्या दुसर्‍या दिवशी या पाचही शहरात एकुण 230 नवे कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. केज शहरात 607 अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाल्या. यामध्ये 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. अंबाजोगाई शहरात एकुण 2091 टेस्ट झाल्या. यामध्ये 46 अहवाल कोरोना बाधित आले.माजलगावमध्ये दिवसभरात 859 तपासण्या झाल्या. यातील 29 अहवाल पॉझिटिव्ह आले. आष्टी शहरातही 600 अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाल्या. यात 33 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. परळी शहरात 2032 अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यातील 105 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close