आपला जिल्हा

Coronavirus: बीड जिल्ह्यात आढळले 78 रुग्ण

बीड — मंगळवारी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 579 संशयितांच्या स्वॅबच्या अहवालातून 78 जणांना कोरोना ची लागण झाली असल्याचे उघडकीस आले. 499 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अनिर्णीत आहेत. बीड आणि परळी, धारूर याठिकाणी सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. पाच शहरांमध्ये सुरु असलेल्या एंटीजन टेस्टमध्ये दोनशे दहा रुग्ण आढळून आले होते.
अंबाजोगाई — 5
तालुक्यातील लोखंडी सावरगाव बनाई नगर चौसाळकर काळवटी तांडा ग्रामीण व क्रांती नगर मध्ये हे रुग्ण सापडले.
परळी –14
शहरातील देशमुख गल्ली गोपानपाले गल्ली पद्मावती गल्ली बँक कॉलनी, स्वाती नगर, समता नगर , कृष्णा नगर नरहरी मंदिर तुळजाई नगर येथील 14 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत
बीड — 21
संकल्प कॉलनी ,क्रांतीनगर, विप्र नगर मध्ये पुन्हा रुग्ण सापडले, आदर्श नगर भगवान नगर इकबाल कॉलनी नर्सरी रोड आवटे मंगल कार्यालय जवळ , धांडे नगर , पेठ बीड ऑफिसर कॉलनी,जुना बाजार तसेच ग्रामीण भागातील हरियाणा धाबा वरील एक कामगार, रुई लिंबा, नेकनूर पालवण याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
गेवराई — 3
चकलांबा पोलिस स्टेशन मधील दोन आरोपी तसेच माऊली नगर मधील एका चा अहवाल पॉझिटिव आला आहे.
आष्टी — 5
तालुक्यातील चिखली, हनुमंत गाव चिखली, पारगाव जोगेश्वरी व शहरातील एका रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
वडवणी — 2
वडवणी शहरात दोन रुग्ण सापडले.
माजलगाव — 2
शहरातील जिजामाता नगर व विवेकानंदनगर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
केज — 7
शहरातील हनुमान मंदिराजवळ वकील वाडी फुलेनगर येथे एक एक रुग्ण सापडला असला तरी ग्रामीण भागात कोरोना ने आपले हात पाय पसरले आहेत. देवगाव, कासारी, कुंबेफळ येथील हे रुग्ण आहेत ‌
शिरूर — 7
यशवंत हॉस्पिटल पाथर्डी रोड मधील एक कर्मचारी, बालाजी नगर, दहिवंडी रोड, तसेच कोळवाडी येथे एकाच कुटुंबातील तिघे जण सापडले
धारूर — 12
चिंचपूर येथील गांजपूर रोडवरील गीता ज्ञान आश्रमातील दहा साधकांना तर श्रीकृष्ण मंदिराजवळ शिनगारे गल्ली व क्रांती चौकातील एका चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close