आरोग्य व शिक्षण

आता उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांना बसणार पाचपट दंड

मुंबई —  श्वसनाशी संबंधित 20 आजारांवर मोफत उपचारांची सोय आहे. परंतु अशा उपचारासाठी फीस आकारणाऱ्या रुग्णालयांना 5 पट दंड करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिला. महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या हॉस्पिटल्समध्ये ही सोय करण्यात आलेली आहे. असं असतांनाही वाढीव बिलं आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांच्यात आता नवं लक्षण दिसत आहेत अस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही नवी लक्षणे आढळून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र दुखणं अंगावर काढू नका असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला.
ते म्हणाले, जे दुरुस्त झाले आहेत त्याना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवतो आहे ही बाब निदर्शनास येत आहे. कोरोनाच आणखी एक लक्षण दिसू लागलं आहे. पुण्यात रुग्ण दुपट होण्याचा रेट राज्यात सर्वात चांगला , पुण्यात 42 दिवसांत रुग्ण दुप्पट होतात, तोच दर राज्यात 30 दिवसाचा आहे. काही औषधं जर परिणामकारक नसेल तर याबाबतचा अंतिम निर्णय टास्कफोर्स ने घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं.राज्यातल्या 5 जिलह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू दर असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यात मुंबई 5.54 टक्के, नंदुरबार 4.48, लातूर, जळगाव 3.78,  रत्नागिरी 3.59, सोलापूर 4.35, अकोला 4.25 टक्के असा दर आहे.

आरोग्य विभागात भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल असंही ते म्हणाले. जिम बाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. जिम सुरू करायला हरकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.  धार्मिक स्थळांबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील. मोठे धार्मिक स्थळ उघडले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असं वाटत असंही ते म्हणाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close