महाराष्ट्र

कोरोनावर मात करणाऱ्या खा. नवनीत राणा कौर व रवी राणांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह

मुंबई — अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी कोरोणावर यशस्वीरीत्या मात केली. रविवारी त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना होम कोरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता दरम्यान मुंबई महापालिकेने पुन्हा त्यांची कोरोना चाचणी केली असता नवनीत कौर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

खासदार नवनीत कौर यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तातडीने नागपूरहून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मुंबई महापालिकेने पुन्हा त्यांची नवनीत राणा आणि रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहे. राणा दाम्पत्यांना 15 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. 
नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याने समोर आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर नवनीत कौर यांच्या अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. परंतु, त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु झाले. मात्र, प्रकृती अजून खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close