आपला जिल्हा

coronavirus : बीडची चिंता कायम जिल्ह्यात सापडले 108 रुग्ण

बीड — दोन-तीन दिवस बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या काही प्रमाणात घटल्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले होते. मात्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्येचे आकडे वाढत असल्यामुळे चिंता कायम राहिली आहे. 716 संशयितांचे स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला असून 605 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तीन अनिर्णीत आहेत तर 108 नवे रुग्ण सापडले आहेत. बीड तालुक्यात सर्वाधिक 40 केज व आष्टी मध्ये प्रत्येकी16 तर माजलगाव मध्ये नऊ रुग्ण सापडले आहेत.
अंबाजोगाई — 5
शहरातील एसआरटी परिसर , चोबारा गल्ली, हनुमान नगर ,प्रशांत नगर याठिकाणी रुग्ण सापडले.
परळी — 9
शहरातील शारदा नगर ,टीपीएस कॉलनी, विद्यानगर ,जुना कोर्ट जवळ ,कंडक्टर कॉलनी, पेठ मोहल्ला याबरोबरच सेलू येथे हे रुग्ण आढळले.
बीड — 40
बीड तालुक्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील धांडे नगर, पांडुरंग रेसिडेन्सी शाहूनगर , गुरुदत्त अपार्टमेंट गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळ जालना रोड येथे पाच रुग्ण सापडले. ठिगळे गल्ली संत नामदेव नगर, सावता माळी चौक, आदर्श नगर, ग्रामसेवक कॉलनी ,बलभीम नगर जुना बाजार ,सावता माळी चौकाजवळ, ज्ञानेश्वर नगर, शास्त्रीनगर, क्रांति कॉलनी मित्र नगर, नवी भाजी मंडई बीएसएनएल टॉवर जवळ भाग्यनगर वाचनालय रोड सारडा रेसिडेन्सी, विद्या नगर पूर्व या भागात कोरोना रुग्ण आढळले तर ग्रामीण भागामध्ये नेकनुर ,करचुंडी, पांढर्‍याचीवाडी, सफेपुर, पिंपळवाडी, जय तळवाडी ,गवारी या ठिकाणीदेखील पेशंट सापडले.
आष्टी — 16
आष्टी तालुक्यात ग्रामीण भागात सर्वाधिक प्रसार झाल्याचे चित्र अहवालातून स्पष्ट होत आहे. टाकळसिंग, लिंबोडी, चिखली, आवारे वस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग च्या समोर तर हनुमंत गाव वाघळुज याठिकाणी रुग्ण आढळून आले.
गेवराई — 2
सावळेश्वर व ब्रह्म गाव येथील हे रुग्ण आहेत.
शिरूर — 4
तालुक्यातील टेंभुर्णी येथील तीन तर बावी बावी येथील एका चा अहवाल पॉझिटिव आला आहे.
केज –16
देशपांडे गल्ली शनी मंदिर जवळ, समर्थ नगर दुसरी गल्ली, शिवाजीनगर धारूर रोड, समर्थ नगर पाचवी गल्ली, माधव नगर तसेच तालुक्यातील आंधळेवाडी, शिरपूरा, मसाजोग, कुंबेफळ येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.
माजलगाव — 9
माजलगाव पत्त्याचा शोध सुरू आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी, टवानी कॉम्प्लेक्स, सन्मित्र कॉलनी, दत्त कॉलनी, वराड हॉस्पिटल मधील कर्मचारी याबरोबरच मानूर येथे रुग्ण सापडला.
धारूर — 3
संभाजी चौक बागवान शेत कासारी, कडघन पुरा येथील हे रुग्ण आहेत.
वडवणी — 4
वडवणी शहरातील तीन व पुसरा येथील एका चा अहवाल पॉझिटिव आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close