महाराष्ट्र

‘सिल्वर ओक’ मधील पाच जणांना कोरोना ची लागण, शरद पवारांचा अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर — राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शरद पवार यांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना तसेच तीन सुरक्षारक्षकांना कोरोना ची लागण झाली आहे. सुरक्षारक्षक हे लोकांना साहेबां पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्यातून ते बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे त्यांची प्रकृती उत्तम असून ते सुरक्षित व व्यवस्थित आहेत. त्याची सर्व काळजी घेतली जात असल्याचे देखील टोपे यांनी सांगितलं.शरद पवार हे महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे त्यांची नेहमीच काळजी घेतली जात आहे. पण त्यांना सामाजिक बांधिलकी जोपासत ते फिरत असतात यातूनही ते संदेश देण्याचा प्रयत्न करतात
त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.पवार साहेबांच्या निवासस्थानातील बाधित कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात, तेथील चाळीतील रहिवाशांचं अँटिजेन व अन्य तपासण्या करण्यात येत आहेत. त्या कर्मचाऱ्यांची काळजीही नियमानुसार घेतली जात आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close