आपला जिल्हा

स्वॅब दिल्यानंतर घरीच थांबा अन्यथा होणार गुन्हा दाखल

          • तर जनतेने प्रशासनाला कळवावे

          • – अँड. अजित देशमुख

बीड — कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वॅब घेतला जातो. स्वॅब घेतल्यानंतर घरी परत पाठवले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीने घराबाहेर न फिरता घरातही स्वतंत्र रहावे. म्हणजे रिपोर्ट येई पर्यंत जर असेल तर त्याचा फैलाव होणार नाही. याबाबत ग्राम दक्षता समिती आणि शहरातील संबंधितांनी देखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अशा परिस्थितीत गावभर फिरल्यास आता गुन्हे दाखल होणार आहेत. जनतेनेही या लोकांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील
जिल्हाधिकारी —- राहुल रेखावार

अशा प्रकारचा नियमभंग करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल. तशा सूचना सर्व प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेनेही याबाबत दक्ष रहावे. स्वॅब घेतलेले व्यक्ती घराबाहेर फिरतात अशा तक्रारी आहेत. या व्यक्तींच्या डाव्या हाताच्या मनगटावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्याचे आदेश दिले आहेत. शिस्त पाळली नाही तर कारवाई होईल.

याबाबत जनआंदोलनाने विनंती केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी या मागणीची तात्काळ दखल घेतली असून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. आता असे कोणी आढळून आले तर जनतेने संबंधित मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अशा दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश या अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावरून देण्यात आले आहेत.

असे होत असेल तर जनतेने कळवावे— अजित कुंभार

स्वॅब घेतलेले लोक जर बाहेर फिरत असतील तर ही बाब गंभीर आहे. सर्व मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना विलगिकरणाचे नियम न पाळणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेने या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व माहिती द्यावी.

हा व्यक्ती देऊन परत आल्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्ट घेण्यासाठी एक ते दीड दिवसाचा कालावधी लागतो. या काळामध्ये हा व्यक्ती मित्र, परिवार, कार्यालयीन कामकाज, व्यापारी असेल तर दुकान आणि घरातील सर्व व्यक्तीच्या संपर्कात बिनधास्त रहातो.

त्यामुळे या व्यक्तीचा संपर्क वाढत असून जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर सर्व संबंधितांना तपासावे लागते. त्यांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळे स्वॅब घेतलेल्या व्यक्तीने तो दिल्यानंतर घरात विलगीकरण करून स्वतः कुटुंबापासून दूर रहायला हवे. बाहेरही कोणाच्याही संपर्कात येणे म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढवणे आहे.

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांनी ग्राम समित्यांची स्थापना केली आहे. त्याप्रमाणे शहरातही अशा प्रकारच्या समित्या कार्यरत आहेत. या समित्यांनी अशा व्यक्तींवर नियंत्रण ठेवून त्याला घरात ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता या समित्यांवर टाकलेली जबाबदारी समिती पार पडत नाहीत, असे बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे.

प्रशासनाचे आदेश न मानणाऱ्या अशा व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची उदाहरणे काही ठिकाणी घडावेत. म्हणजे समाजावर संसर्गाचा हा रोग पसरणार नाही. त्यामुळे प्रशासनाने काही लोकांवर काही ठिकाणी गुन्हे दाखल करायला हरकत नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज शंभरच्या आसपास आणि एके दिवशी दोनशेच्या वर कोरणा पेशंट बीड जिल्ह्यात आढळले आहेत.

जोपर्यंत जनता आणि रूगांच्या संपर्कातील व्यक्ती स्वतःहून स्वतंत्र राहणार नाहीत, तोपर्यंत कोरोणाचा फैलाव वाढत जाणार आहे. गेल्या तिन, चार दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे हा संसर्ग आणखी गतिमान होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे जनतेने याची तात्काळ दखल घ्यावी.

त्याचप्रमाणे स्वॅब देऊन आल्यानंतर आपण पॉझिटिव्ह आहेत की, निगेटिव्ह हे कळण्यापर्यंतच्या काळात तरी संबंधित व्यक्तीने स्वतःला वेगळे ठेवावे. आणि संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेऊन देश कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close