क्राईम

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वडवणी — तालुक्यातील उपळी येथील  एक अल्पवयीन मुलगी प्रातःविधीसाठी जात असतांना गावातील तीन तरुणांनी तिला अडवून एकाने तिला रस्त्यात असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले. तिच्यासोबत अश्लिल चाळे केले व त्याचे फोटो मोबॉईलमध्ये काढले. घडलेला प्रकार कोणाला सांगीतल्यास मोबॉईल मधील फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली तिघांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
वडवणी तालुक्यातील उपळी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचाला जात असताना गावातील तीन युवकांनी तिला रस्त्यात आडवून शाळेजवळील वीट भट्टी च्या रूम मध्ये तिला घेऊन जात तिच्याशी अश्लिल चाळे करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.तसेच जर ही माहिती कुणाला सांगितलीस तर तुझे मोबाईल मध्ये अश्लिल चाळे करतानांचे सेल्फी फोटो काढलेले सगळ्यांना दाखवेल.अशी धमकी देत आरोपी फरार झाले.मात्र मुलीने हिम्मत करत घरी येऊन सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. आईने तात्काळ वडवणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी राजेश उद्धव नाटकर,नामदेव केरबा आगवाणे,दीपक बापुराव माळी,सर्व राहणार उपळी यांच्याविरोधात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुरनं १८०/२०२०, कलम ३५४,५०६,३४ भा.द.वि.सह कलम ८,१२ पोक्सो २०१२ प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा तपास वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय महेश टाक हे करत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close