क्रीडा व मनोरंजन

धोनी पाठोपाठ सुरेश रैनानेही घेतली क्रिकेटमधून निवृत्तीनिवृत्ती

मुंबई — धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. २०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर २०१५ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

रैनानं आतापर्यंत भारतासाठी १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,६१५ धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं आतापर्यंत १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा आणि १३ विकेट्स आणि टी-२० सामन्यांमध्ये १,६०५ धावा केले आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close