महाराष्ट्र

आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार — वडेट्टीवार

 मुंबई — कोरोना संकटकाळात बस सेवा बंद करण्यात आली होती मात्र राज्यातील बस सेवेची गरज लक्षात घेता आंतरजिल्हा एसटी सुरू करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून ही बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.
यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवाश्यांना प्रवास करता येणार नाही. एसटी बस सेवेशिवाय राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
याशिवाय कोविड नियम पाळून राज्यात जिम सुरू करणार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. राज्यातील जिम सुरू करण्यात याव्यात, यासाठी मनसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे विनंती केली होती. अखेर जिम सुरू करण्यास सरकारने होकार दर्शवला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close