महिलांचा सन्मान करणे हेच पुरुषार्थाचे खरे लक्षण आहे – श्रीमती जयमाला साबणे

चौसाळा — महिलांचा सन्मान करणे तिचा आदर करणे हे खऱ्या अर्थाचे पुरुषार्थाचे खरे लक्षण आहे. आजच्या काळात ज्या घरात स्त्रियांचा आदर केला जातो तेच घर पुढे गेलेले दिसते राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आपण घेऊया असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्रीमती जयमाला साबणे यांनी केले. त्या कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनातर्फे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.चंद्रसेन आवारे होते. पुढे बोलताना श्रीमती साबणे म्हणाल्या कि महिलांनी स्वताच्या हक्कासाठी देलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर महिला दिन म्हणून साजरा केले जातो भारताच्या इतिहासात अशा हजारो स्त्रिया उदाहरण सापडतील कि त्यांनी समाजाला खूप मोठी प्रेरणा दिली अशा अनेक स्त्रियांची उदाहरणे श्रीमती साबणे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीडच्या भूमीकन्या स्व.माजी खासदार सौ.केशरबाई क्षीरसागर व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य चंद्रसेन आवारे म्हणाले कि महिलांची शक्ती खूप मोठी आहे. स्त्रियांच्या मधील उर्जेचा आपण वापर केला तर आपला देश बलशाली होईल. त्यांनी स्वर्गीय लोकनेत्या सौ.केशरबाई क्षीरसागर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यापासून प्रत्येकांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.सुधाकर वनवे यांनी केले. तर सुत्रसंचलन प्रा.डॉ.सोमनाथ लांडगे यांनी केले व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विलास भिल्लारे,कमविचे उपप्राचार्य प्रा.गणपती धावल्शांख,पी.जी.संचालक डॉ.काकासाहेब पोकळे,प्रा.सय्यद शाहीन यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातीतील महिला कर्मचारी, विद्यार्थिनी, विद्यार्थी, कर्मचारी, बहुसंखेने उपस्थित होते.