आपला जिल्हा

दिलासादायक: बीड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या घटली

बीड — जिल्ह्यातील सहा शहर लॉक डाउन केल्याच्या दुसऱ्या दिवशी दिलासादायक बातमी मिळाली असून रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात फक्त 67 कोरोना रुग्ण सापडले आहेत. बीडमध्ये 17, अंबाजोगाईत 4, धारूर मध्ये 5 ,केज मध्ये 14, परळी फक्त 4, शिरूर एक, वडवणी 2, माजलगाव नऊ, आष्टी दोन गेवराई 8 तर पाटोद्यात एक रुग्ण सापडला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या शतकापार गेली होती. अनेक वेळा तर हा आकडा द्वि शतकापर्यंत गेला. वाढते संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात सहा शहरांमध्ये लाॅक डाऊन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी दिलासा देणारा अहवाल प्राप्त झाला. 645 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले. यामध्ये 576 यांच्या अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल अनिर्णित अजून 67 रुग्ण सापडले आहेत.
बीड 17
शहरांमध्ये चौदा रुग्ण सापडले असून श्रीराम नगर, भाग्यनगर, अजीजपुरा, ऑफिसर कॉलनी, माळीवेस, संत नामदेव नगर, कालिका नगर, मन्सूर शहा दर्गा, तेंडुलकर कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, मित्र नगर, सराफा लाईन धोंडिपुरा या भागात रुग्ण सापडले तर तालुक्यातील बेलूरा, सांडरवन येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
अंबाजोगाई — 4
तालुक्यातील घाटनांदुर, कांगणेवाडी सोबतच ते शहरातील शंकर नगर मोरेवाडी येथे रुग्ण सापडले आहेत
धारूर — 5
शहरातील बारभाई गल्ली काशिनाथ चौक, शिक्षक कॉलनी, गोपाळपुर, कुंभारवाडा येथे रुग्ण सापडले
केज –14
शहरातील समर्थ मठ, शाहूनगर, फुलेनगर, माधव नगर, वसुंधरा बँकेजवळ आजिज पुरा, कामगार नगर कळंब रोड, समर्थ नगर तर ग्रामीण भागात तांबवा, लाखा ,कानडी माळी, सोनिजवळा येथे रुग्ण सापडले
परळी — 4
शहरातील शारदा नगर माणिक नगर तसेच ग्रामीण भागात टोकवाडी येथे रुग्ण सापडले.
शिरूर –1
तालुक्यातील टेंभुर्णी येथे हा रुग्ण सापडला आहे.
वडवणी — 2
हे दोन्ही रुग्ण वडवणी शहरातील आहेत.
माजलगाव — 9
शहरातील अशोक नगर येथे तीन रुग्ण सापडले त्यानंतर ग्रामीण भागात देवखेडा पाथरूड चिंचगव्हाण येथील हे रुग्ण आहेत.
आष्टी — 2
तालुक्यातील टाकळसिंग येथे व मारवाडी गल्ली कडा येथे बाधित रुग्ण आढळले
गेवराई — 8
गुरुवारी सापडलेले सात रुग्ण ग्रामीण भागातील असून मादळमोही, विठ्ठल नगर तलवाडा, कुंभारवाडी, बोरगाव बुद्रुक, अर्धमसला, भायाळा येथील आहेत. तर शहरातील सरस्वती कॉलनी येथे एक रुग्ण सापडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close