क्राईम

तलावात बुडाल्यामुळे 17 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत

धारूर — गुरुवारी सकाळी गावा जवळ असलेल्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलीचा पाय घसरून तलावात पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना गावंदरा येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गांवदरा येथील प्रिती घुले ही सतरा वर्षाची मुलगी बारावी वर्गात शिकत होती. गुरूवारी सकाळी प्रीती गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेली. यावेळी पाय घसरल्याने ती तलावात पडून बुडाली. याची माहिती मिळाली असता ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिला पाण्यातून बाहेर काढून धारूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असलेल्या प्रीतीला दहावीत 96 % गुण होते. यावर्षी ती बारावीत होती. मृत्यूनंतर नेञदानाचा तिने संकल्प केल्याची माहिती आहे. मुख्याध्यापक ए. आर. तिडके तसेच ग्रामस्थांनी गावाचे नाव गाजवणारी मुलगी मृत झाल्याच्या भावना माडंत हळहळ व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close