श्रीकृष्णाचं नाव धारण करणाऱ्या एसपी नंदकुमार ठाकूर यांनी केली गोवंश रक्षण करणाऱ्या ठाणेदाराची उचल बांगडी; गोवंश तस्करीला असंही खत पाणी

बीड — ठाकूर नंदलाल,गोपाल,नंदकुमार ही श्रीकृष्णाची नावं आहेत. गोवंशाच्या रक्षणामुळेच त्यांना ही नामाची बिरुदावली चिटकली गेली. मोठ्या हौसेने त्यांनी ती मिरवली त्यांच्या भक्तांनीही त्यांच्या याच नावाचा जयजयकार देखील केला. पण “नाव मोठं लक्षण खोटं” या म्हणीचा प्रत्यय बीडमध्ये मात्र दिसून आला.तीन महिन्याच्या कारकिर्दीत हजारे यांनी गोवंश रक्षणासाठी नेकनूर ठाणे हद्दीत केलेल्या कारवाया श्रीकृष्णाचच नाव धारण केलेल्या पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना खूपल्या त्यांनी हजारेंची उचल बांगडी केली व गोवंश तस्करांना मोकळी वाट करून दिल्याचं जनतेत बोललं जाऊ लागलं.
“नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा” यासारख्या म्हणीतून नावाचा आणि कर्माचा काहीच संबंध नसतो याचा प्रत्यय नेहमीच येत राहतो. तसाच काहीसा अनुभव सध्या नेकनूर ठाण्याच्या हद्दीतील जनतेला येऊ लागला आहे. देश पातळीवर गो – रक्षणाची मोहीम राबविली जात आहे. देशात राज्यातही हिंदुत्ववादी सरकार कार्यरत आहे.
पण तरीही गोवंश रक्षणाचे काम एखादा प्रामाणिकपणाने करत असेल तर ते प्रशासनातीलच नव्हे तर मतांचं राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूपल्याशिवाय राहत नाही. हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं पहायला मिळू लागला आहे.तर किस्सा असा आहे की पोलीस अधीक्षकांच्या पथकात काम करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी प्रामाणिकपणाने अवैध धंद्यांसोबतच गोवंश तस्कराविरोधात मोहीम राबवत आपल्या कर्तव्याची चुणूक दाखविली. कायदा सुव्यवस्थेचं राज्य कसं असतं याचा प्रत्यय त्यांनी आपल्या कारकीर्दीत आणून दिला. तीन महिन्याच्या कालावधीत खंडाळा फाटा येथे 18 गोवंशाची होत असलेली तस्करी पकडली. खडकत येथे कारवाई करत 45 गोवंशाना जीवदान दिले. इतकच नाही तर कत्तलीसाठी जात असलेल्या तेरा बैलांना वाचवत. पाऊणशे गोवंशाच रक्षण करण्याचं काम त्यांनी इमानेइतबारे केलं. हीच बाब गोवंश तस्करांच्या लॉबीला रुचली नाही. असा अधिकारी नेकनूर ठाण्याला राहणं अनेकांच्या हिताचं नसल्यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ( गोपाल)ठाकूर (श्रीकृष्ण) यांनी गोवंश तस्करांच्या मनसुब्यालाच खतपाणी घातल व गोवंश रक्षणासाठी धडपडणाऱ्या विलास हजारेंची उचल बांगडी करत ठाण्याची सूत्र मुस्तफा शेख यांच्या हातात दिली. मुस्तफा शेख यांची कारकीर्द देखील वादग्रस्त नसली तरी त्यांच्या यापूर्वीच्या कार्यकाळात अवैध धंदे सुखेनैव सुरू होते. या अवैध धंद्यातून नेकनूर पोलीस ठाणे मोठ्या कमाईच ठिकाण म्हणून पूर्वीचं नावाजलेलं होत. तो आब ,नावलौकिक शेख यांनी कायम ठेवला होता. मात्र हजारे यांनी हा नवलौकिक धुळीला मिळवला होता ही बाब पोलीस प्रशासनातील अनेकांना खटकत होती. त्यामुळे ही बदली जाणीवपूर्वक करण्यात आल्याचं आता बोललं जाऊ लागला आहे. गोवंश रक्षणाचं काम श्रीकृष्णाचा नाव धारण करणाऱ्या नंदकुमार ठाकूर यांनाच कसं रुचलं नाही असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. हजारे यांना पुन्हा नेकनूर पोलीस ठाण्याचे सूत्र द्यावीत अशी मागणी गोवंश रक्षकांकडून केली जाऊ लागली आहे.