क्राईम

मराठवाडयात एक कोटी 34 लाख रूपयांची वीज चोरी उघड

औरंगाबाद — महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या मराठवाडयातील आठ जिल्हयात माहे जानेवारी 2023 मध्ये वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली.  यामध्ये 242  वीज मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. या वीज चोरी प्रकरणी एक कोटी 34 लाख 66  हजार रूपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. वीज चोरीच्या अनुमानित वीज बिल दंडाची रक्कमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विघुत कायदयानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

     मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात जानेवारी 2023 या कालावधीत दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत  वीज मीटरची तपासणी करण्यात आली.  विघुत कायदा 2003 नुसार कलम 126 अंतर्गत शेजा—याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुस—या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो.  तसेच कलम 135 मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व  कलम 138 मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.

     यामध्ये औरंगाबाद शहरात 36.43 लाख रूपये वीज चोरी, औरंगाबाद ग्रामीण 12.66 लाख रूपये वीज चोरी, जालना जिल्हा 9.44 लाख रूपये वीज चोरी, लातूर जिल्हा 37.55 लाख रूपये वीज चोरी, बीड जिल्हा 8.25 लाख रूपये वीज चोरी, उस्मानाबाद  जिल्हा 8.14 लाख रूपये वीज चोरी, नांदेड जिल्हा 9.76 लाख रूपये वीज चोरी,हिगोंली जिल्हा 5.01 लाख रूपये वीज चोरी,परभणी जिल्हा 20.07 लाख रूपये वीज चोरी केलेल्या अनुमानित दंडाची एकूण  एक कोटी 34 लाख रूपये आहे.

ग्राहकांनी दंड न भरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले  आहेत. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.  अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

       आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहिम राबविण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  श्री. विजय सिंघल व औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे  सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश  गोंदावले तसेच कार्यकारी संचालक — सुरक्षा व अंमलबजावणी  श्री. प्रमोद शेवाळे  यांनी दिले असून   मराठवाडयात  सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उप संचालक श्री. सतीश कापडणी व अतिरिक्त कार्यकारी आभियंता श्री. सतीश शिंपी यांनी सदर वीज चोरीची मोहीम  पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button