क्राईम

भूखंड घोटाळा: हजरत पीर वाले साहेब दर्गा व जामा मस्जिद ची जमीन हडपली! आंदोलनकर्त्यांचे उपोषण सुरूच

बीड — जिल्ह्यात भूमाफियांनी हैदोस घातला असून देवस्थान जमिनी बळकावण्याचे प्रकार घडत आहेत. यातून भूमाफिया रंगलाल तर अधिकारी मालामाल होत असल्याचं दिसू लागला आहे. हजरत पीरवाले साहेब दर्गा व जमा मस्जिद किल्ला बीड(खिदमत मदत) इनामी जमीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या नावे करून प्लॉटिंग करून भूमाफिया मालामाल झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी नगरसेवकासह बालेपीर भागातील नागरिक उपोषणास बसले आहेत.चार दिवस झाले तरी या उपोषणाकडे लक्ष देण्याची गरज नवीन आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनाही वाटली नसल्याचं दिसत आहे. भूमाफियांशी अधिकाऱ्यांचं असलेल्या साटेलोट्यामुळे अधिकाऱ्यांची अवस्था “मेहुणी बायको मिंधा संसार“अशी झाली आहे.
बीड जिल्ह्यात देवस्थान जमीन घोटाळा सध्या गाजत आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी देखील मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी आपल्या घशात घातल्याचं उघडकीस येत आहे. असाच आणखी एक प्रकार बीडमध्ये देखील घडला आहे. या भूमाफिया भामट्याने हजरत पीरवाले साहेब दर्गा व जामा मस्जिद किल्ला बीडची(खिदमत माश) इनामी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. एवढ्या वरच ही बाब थांबली नाही तर ही जमीन प्लॉटिंग करून कोट्यावधी रुपयांची कमाई केली. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास यावी यासाठी गेल्या चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा नगरसेवकासह सुजाण नागरिकांनी घाट घातला आहे. जामा मस्जिद किल्ला बीडची जवळपास दीडशे एकर जमीन व पीर वाले साहेब दर्गा ची 52 एकर जमीन तरफ गिराम मध्ये आहे. पीरवाले साहेब यांची सेवा इनाम सर्वे नंबर 29 -5. 35 एकर सर्वे नंबर 207-3.65 एकर, सर्वे नंबर 41- 21.2 एकर, सर्वे नंबर 42-20.25 एकर जमीन आहे. तसेच जामा मस्जिद किल्ला ची बी तरफ गिराम सर्वे नंबर 45-32.55 एकर, सर्वे नंबर 49- 32.525 एकर सर्वे नंबर 51 मध्ये 21.5 एकर, सर्वे नंबर 121 मध्ये 25.8 एकर, सर्वे नंबर 122 मध्ये 25.025 इतकी सेवा इनाम जमीन भारतीय सेंट्रल वक्फ कौन्सिलच्या ऑनलाईन रिपोर्टवर व महाराष्ट्र शासन राजपत्रावर असूनही तक्रारी अर्ज देऊन देखील कोणतीच कारवाई शासनाने व वक्फ बोर्डाने केली नाही. त्यामुळे भू माफीयांचे फावले आहे. भू सुधार अधिकारी व वक्फ अधिकारी यांच्या मदतीने हा प्रकार राजुर सुरू आहे. केलेल्या तक्रारी वापस घेण्यासाठी आंदोलनकर्त्यावर दबाव टाकून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन सर्व बेकायदेशीर खालसे व सातबारा वगळून दर्गा जामा मस्जिद व कब्रस्तानच्या नावाची नोंद करावी या मागणीसाठी ईदगाह बालेपिर कब्रस्तान जामे मस्जिद किल्ला वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्षानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला चार दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अधिकाऱ्यांचा “मेहुणी बायको मिंधा संसार” असल्याचं म्हटलं जाऊ लागला आहे. नवीन आलेल्या जिल्हाधिकारी तरी याकडे लक्ष देतील काय? भू माफियावर गुन्हे दाखल करतील काय? या प्रकरणात मालामाल झालेल्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचं धारिष्ट्य दाखवतील काय? असे प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button