क्राईम

बीड हादरलं : भिक्षा मागून खाणाऱ्या अंध महिलेच्या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार!

बीड — भिक्षा मागून खाणाऱ्या अंध महिलेच्या तीन वर्षीय मुलीला खाऊचे अमिष दाखवून तिला उचलून नेत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना शहरातील क्रीडांगणाच्या परिसरात रात्री 10च्या सुमारास घडली.
याप्रकरणी आज पहाटे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात आरोपीवर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावर रक्ताचे डाग देखील आढळून आले आहेत. या घटनेनंतर परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीस त्याच्या घरातून अटक केली असून हा मुलगा पेपर वाटप करण्याचे काम करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 3 ते 4 नराधमांनी हे संतापजनक कृत्य केलं आहे. चिमुकल्या मुलीला खाऊच आमिष दाखवून क्रीडांगणाच्या शौचालयाच्या परिसरात नेल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी पीडित मुलगी ज्यावेळेस मोठमोठ्याने ओरडायला लागली, त्यानंतर हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला आणि त्या ठिकाणाहून नराधम आरोपींनी तिथून पळ काढला.
दरम्यान घटनेची माहिती कळताच, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम घटनाथळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत, पीडित चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांनी, तीन ते चार जण त्या ठिकाणी होते, मुलीने आरडाओरड केल्यावर ते पळून गेलेअसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात एक आरोपी होता का तीन ते चार जण सहभागी होते ? याचा तपास करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडं सर्वांचे लक्ष लागल आहे दरम्यान, मागून खाणाऱ्या एका अंध महिलेच्या चिमुकल्या मुलीवर उचलून नेऊन अत्याचार केल्याने, एकच खळबळ उडाली असून नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा गुन्हेगारांना कडक शासन कराव अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button