महाराष्ट्र

‘ मला दानवेचा जावई म्हणू नका,’हर्षवर्धन जाधवांचा घटस्फोटासाठी अर्ज

औरंगाबाद — माजी आ.हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी दिली असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी विनंती करताना म्हटले की, मला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून संबोधू नका. पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली असल्याचेही जाधव यांनी सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले की, मी कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहे , रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांचा काही महिन्यापूर्वी व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले होते की, 26 मार्च 2003 ला संजना यांच्याशी माझा विवाह झाला. नवव्या महिन्यात आदित्य झाला. त्यानंतर संजनानं वैवाहिक संबंध तोडले. ते आजपर्यंत नीट झालेले नाहीत. तिच्या वागण्यामुळे मला मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे मी मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो. तिला पण नेलं. पण ती यायला तयार नव्हती. त्यामुळे घरात समस्या निर्माण होऊन आई वृध्दाश्रमात निघून गेली. असे हर्षवर्धन जाधव म्हणाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close