ताज्या घडामोडी

पुण्याजवळ झालेल्या अपघातात भोंडवे कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बीड — शिरूर – पुणे-नगर रस्त्यावर, कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात पाटोदा तालुक्यातील डोमरी गूरुकूल च्या संचालकासह कुटूंबातील तीन जण ठार झाले. मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत कारचालक गंभीर जखमी झाला.
सुदाम शंकर भोंडवे वय 66वर्ष, सिंधुबाई सुदाम भोंडवे वय 60 वर्ष, कार्तिकी अश्विन भोंडवे वय 32 वर्षे व आनंदी अश्वीन भोंडवे वय 4वर्ष, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड अशी या अपघातातील मृतांची नावे असून, अश्विन सुदाम भोंडवे वय 35 वर्षे हे या अपघातात जखमी झाले आहेत. ते कार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुबाई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका कार क्र. (एमएच 12/ईएम 2978 मधून चाकणकडे जात होते.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेला कंटेनर क्र. एमएच 43/ बीजी 2776 वर त्यांची कार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुबाई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेन व स्थानिक तरूणांच्या मदतीने कंटेनरखाली घुसलेली कार, कारमधील जखमी व मृतांना
बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला, तर मोटारीत अडकून सुदाम भोंडवे, सिंधुबाई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. कार्तिकी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नगर येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे देखील जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कारेगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button