राजकीय

अजित पवार पुन्हा राजकीय भूकंप घडवणार ! शरद पवारांनी सोपवली जबाबदारी

मुंबई – लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र राज्यात महा विकास आघाडी सरकार झाल्यानंतर भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. या अभियानाची संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमध्ये गेलेल्या आपल्या नेत्यांना पक्षामध्ये पुन्हा घेण्यासाठी नवी व्यूहरचना आखली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षांचे राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांचा प्रवेश करुन घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. आमदारांना घेताना शिवसेना व काँग्रेस पक्षाला देखील विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचेही सुत्रांकडून माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला हा दावा जर खरा ठरत असेल तर ते कोणते आमदार पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार याबाबतच्या चर्चेला आता उधाण आलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close