देश विदेश

65 हजार चौरस मीटर जागेवर उभे राहणार नवे संसद भवन

नवी दिल्ली — देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत संसद भवन जवळच 65 हजार चौरस मीटर जागेत नवे संसद भवन उभारण्यात येणार असून बांधकामासाठी निविदा भरण्यास तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. यामध्ये लार्सन ऍन्ड टूब्रो, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि शापूरजी पालनजी ऍन्ड कंपनीचा समावेश आहे.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने ही माहिती दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सात कंपन्यांनी पूर्व-पात्रता निविदा दाखल केल्या होत्या. उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम लिमिटेडनेही निविदा दाखल केली होती. त्यातून तीन कंपन्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. संसद भवनाच्या परिसरातील 118 क्रमांकाचा भूखंड नव्या भवनासाठी निवडला गेला आहे.

असे असेल नवे संसद भवन…
सध्याच्या संसद भवनाजवळच उभी राहणार इमारत
बांधकामाचा अंदाजित खर्च 889 कोटी रुपये
   सिमेंट काँक्रीट प्रेम्सचे स्ट्रक्चर
  जमिनी पासून  1.8 मीटर उंच पाया
16921 चौरस मीटरचे तळघर
इमारतीला तळमजला धरून दोन मजले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close