कृषी व व्यापार
बीडच्या कृषी महोत्सवात इलेक्ट्रिक बैलाचे प्रदर्शन

बीड — आज घडीला शेतीचे सर्वच कामे यंत्रिकीकरणाच्या माध्यमातून पार पाडत कमी कालावधीमध्ये जास्तीची मशागत करून घेतली जाते. यामुळे शेतकर्यांच्याही उत्पदनात वाढ होतांना पहावयास मिळते. मात्र बहुतांश वेळेस अनेक शेतकर्यांकडे बैल नसल्याने आणि बैल जोडी घेण्याची कुवत नसल्याने अनेक कामांना खोळंबा होतो. मात्र तो खोळंबा आता दूर करता येणार असून बीड जिल्हा कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये शेतकर्यांना आधुनिक शेतीसाठी इलेक्ट्रिक बैलाचे प्रदर्शन करत शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याच बरोबर विविध नवनवीन उपक्रमांची व साहित्यांची माहिती मिळणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी आधुनिक शेतीसाठी या कृषी महोत्सवाला आवश्य भेट देवून मार्गदर्शन घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज ग्राऊंड येथे नोदणीक्रत दोनशे स्टॉलच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्यांना शेतीमधील आधुनिक माहितीसाठी तसेच शेतकर्यांनी कमी कालावधीत अधिकची मशागत करत शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा प्रकारे घेतले पाहिजे याबाबत विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.24 फेबु्रवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार्या कृषी महोत्सवात शेतकर्यांना दोनशे स्टॉलमध्ये वेगवेगळ्या शेतीविषयक तसेच शेतीपुरक साहित्यांची तसेच शेतकर्यांच्या हिताचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याच बरोबर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर आणि प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या नेतृवाखाली जिल्ह्यातील शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत व्हावी म्हणून इलेक्ट्रिकल बैल कृषी प्रदर्शनात दाखल करत शेतकर्यांना त्यांचे प्रत्येक्षीत दाखविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकर्यांनी या भव्य कृषी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, प्रकल्प संचालक (आत्मा) सुभाष साळवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व कृषी विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.