आपला जिल्हा

संचारबंदीत अनावश्यक फिरणाऱ्यांची वाहने जप्त करा – अँड. अजित देशमुख

बीड — कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही अनावश्यक वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत. ही वाहने पोलिसांनी जप्त करून संचार बंदी होईपर्यंत ताब्यात ठेवावीत, गुन्हेगारांवर कारवाई करावी आणि जास्तीत जास्त दंडाची आकारणी करावी, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

कोरोनाला प्रतिबंध करणे हा सार्वजनिक हिताचा मुद्दा आहे. मात्र जे लोक नियम पाळायला तयार नाहीत, तेच यात अडथळा आणताना दिसत आहेत. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना आणि वाहनाचा पास नसताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहणे दिसत आहेत. त्याचप्रमाणे हायवे क्रॉस करून गल्ली बोळातून मार्ग काढून लोक फिरायचे हाल सोडत नाहीत.

त्यामुळे गाव त्या गावाच्या भोवताली देखील पोलिसांनी चक्कर मारून वस्त्यांमध्ये फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ही वाहने जप्त करणे आवश्यक आहे. वाहन धारकांवर जोपर्यंत कठोर कारवाई आणि मोठ्या प्रमाणात दंड होत नाही, तोपर्यंत वाहन धारक घरी थांबणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी संचारबंदी आहे, त्या सहा शहरांमध्ये गल्ली बोळात फिरुन वाहनांची धरपकड व्हायला हवी. तरच बिना कामाच्या फिरणाऱ्यांवर दबाव निर्माण होईल.

यातून कोरोणाला प्रतिबंध करणे शक्य होईल. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त वाहने पकडून जास्तीत जास्त दंड करून ही वाहने संचारबंदी संपत नाही तोपर्यंत सोडू नयेत. जुगाऱ्यांना जवळ थांबवू नये, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close