महाराष्ट्र

डोळ्याच पारणं फेडणाऱ्या अविस्मरणीय शिवजयंतीचे साक्षीदार व्हा-आ.संदीप क्षीरसागर

महिला भगिणींची,ज्येष्ठांची महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता बसण्याची विशेष व्यवस्था
बीड — मागील अनेक वर्षापासून बीड शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अविरत व अखंड शिवजयंती साजरी करण्यात येते. या शिवजयंतीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सांस्कृतिक कला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी अनेक राज्यातून आलेल्या कलाकारांनी त्यांची सांस्कृतिक कला व तेथील चित्तथरारक मैदानी खेळ शिवप्रेमींना दाखवले होते. यावर्षी 10 विदेशी फायर आर्टिस्टयुक्रेन,रशिया,मेक्सिको,ऑस्ट्रिया बहुराष्ट्रीय कलाकार हे सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सवामध्ये सादरीकरण करणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक आ.संदीप क्षीरसागर यांनी दिली.


दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी सुर्योदया बरोबर सकाळी 6.45 वाजता शासकीय महापुजा होणार आहे. या शासकीय महापुजेला बीडच्या जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे,पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सुरेश साबळे जिल्हाशल्यचिकित्सक,जि.रू.बीड, नामदेव टिळेकर प्रशासक,न.प.बीड, निताताई अंधारे मुख्याधिकारी,न.प.बीड, यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांची उपस्थिती राहिल. तर प्रमुख पाहुणे म्हणुन बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त/सचिव तथा आ.रोहित दादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई राजेंद्र पवार या प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित असणार आहेत. दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते शासकीय महापुजा होणार आहे. तसेच संभाजी महाराज क्रीडांगण येथे सायंकाळी 5 ते रात्री 10 च्या दरम्यान नामांकित करवीर ढोल पथक, केरळचे शबरी चेंडे नृत्यु, विदेशी कलाकारांचा फायर शो, पंजाबचा प्रसिद्ध वीर खालसा कला, केरळचे शबरी चेंडे नृत्यु व शेवटी 650 वादकांनी सज्ज असा ढोल व झांज पथक देखील आपल्या पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत. कार्यक्रमस्थळी महिला भगिणी, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या विशेष आसन व्यवस्था करण्यात आली असून याची मार्गिका सागर हाईटच्या बाजुस व स्काऊटभवनच्या मागील रोड एचडीएफसी बँकेच्या शेजारी येथुन विशेष गेट फक्त महिला भगिणी यांच्यासाठी राखीव असणार आहे. उद्या दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सायंकाळी पाच वाजता वरील सर्व कलाप्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पार पडणार आहेत. तरी बीड शहरातील व जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी या सांस्कृतिक व चित्तथरारक कार्यक्रमांना शासनाने सांगितलेल्या कोरोना नियमांचे पालन करत आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button