शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जेल मध्ये जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही – आ.सोळंके

माजलगाव — आमदार प्रकाश सोळंके हे पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावरून आक्रमक झाले असून आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजलगाव येथील वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शेतकरी,कष्टकरी, कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
शेतक-यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विटल 10 हजार रू. भाव देवुन खरेदी करावी,शेतक-यांच्या कापुस पिकास प्रति क्विंटल 12 हजार रू भाव देवुन खरेदी करावा.शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये.शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केलेले पून्हा सुरू करावीत,अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकऱ्यांचे अनुदान त्वरीत बँक खात्यात जमा करावीत, शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान 50 हजार रू. बँक खात्यात जमा करावीत, शेतकऱ्यांची दोन लाखाच्या पुढील थकीत रक्कमेची कर्ज माफी देण्यात यावी,एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेले धान्य पुर्ववत सुरू करावे या प्रमुख मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी बोलताना आ. प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडत नाही तर तो पाडला जातो ही शोकांतिका आहे असं सांगितलं.शासनाने निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच भाव मिळेल ही भावना यावेळी व्यक्त केली.आज शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.असे प्रकार घडत राहिले तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गाव बंदी केलं जाईल असा ईशारा आ. सोळंके यांनी यावेळी दिला.
या आंदोलनासमयी आ.प्रकाश सोळंके यांनी तेलंगणा राज्यातील के.सी.आर सरकारचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.अवघ्या आठ वर्षात या सरकारने बळीराजाला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले.सिंचन क्षमता वाढविणे,भात खरेदीत निरंतर वाढ,24 तास ऊर्जा पुरवठा, भूजलपातळीत वाढ,कृषी उत्पादनांसाठी साठवण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 21557 कोटींची कर्जमाफी करत 39.26 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला.पुढील काळात शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही.तर,हे आंदोलन अधिक तीव्र करून ठिकठिकाणी चक्का जाम केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनावेळी शेतकऱ्यांसह राजेश्वर चव्हाण, अशोक डक, जयदत्त नरवडे, संभाजी शेजुळ, दयानंद स्वामी, खुशिद नाईक, वगरेनाना, कल्याण आबुज, रामप्रभू साळुंखे, मनोहर डाके, नासेरखाॅ, अच्युत लाटे,खलील पटेल, डाॅ. वसीम मनसबदार, उध्दव नाईकनवरे, रूक्मानंद खेत्री, भगवान कदम, संशाक सोळंके, संजय शेजुळ,अगद खेत्री, मोकिंदा चव्हाण, राजू राठोड, शिवप्रसाद खेत्री, सुशांत पौळ, भागवत भोसले, सुनिल रूद्रवार, नवाब पटेल,कचरू खळगे, नवनाथ धाईजे,राजेश मेंडके श्रीराम जाधवर, छगन जाधव, विलास साळवे, सुनिल शिंदे, अॅड प्रमोद तौर,गायकवाड क्षितिज,आसेफभाऊ शेख, राजू पठाण,नितीन जाधव, सय्यद लतीफ आदी उपस्थित होते.