क्राईम

कंटेनमेंट झोन असताना लग्न लावले, वधू वरा सह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

कडा  — कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे कडा शहर कंटेनमेंट झोन जाहीर करत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र या काळात कायदा धाब्यावर बसवत लग्न लावणाऱ्या वधू, वर पित्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडा भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कडा
कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरीही एका सुशिक्षित वर पित्याने आपल्या मुलाचा विवाह मंगळवारी आयोजित केला होता. हा विवाह समारंभ पार पडल्यामुळे बीड येथील वधू,तिचे आई-वडील आणि नवरदेव व त्याचे आई-वडीलांसह सहा जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरु असताना पोलिसांना माहिती न देता विनापरवाना लग्न लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close