ताज्या घडामोडी

🌹💐केशव कदम यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार जाहीर💐🌹

26 फेब्रुवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण सोहळा

बीड — येथील पत्रकार, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्यवाहक केशव लक्ष्मण कदम यांना जय मल्हार प्रतिष्ठाणच्यावतीने दिला जाणार राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार जाहीर झाला. निवडीचे मंगळवारी (दि.31) पत्र त्यांना देण्यात आले. दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
जय मल्हार समाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतीक, धार्मिक, सहकार, कला, क्रीडा व पत्रकार या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. येथील पत्रकार, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्यवाहक केशव कदम यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांची यशवंतरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शहरातील यशवंतराव नाट्यगृहात वितरित होणार्‍या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र गाडेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत भोंडवे, अ‍ॅड.राजू शिंदे, भगवान माने, प्रा.नामदेव चांगण, नितीन गोपन, प्रा.भास्कर चादर, प्रा.चंद्रकांत चाळक, प्रा.डॉ.सत्यनारायण ढवळे यांनी केले आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button