क्राईम

स्कॉर्पिओ आडवी लावत पोलिसांना मारहाण करत हायवा पळवला

गेवराई — स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमापूर फाट्याजवळ वाळू घेऊन जाणारे तीन हायवा मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पकडले. हे हायवा पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना हायवा मालकाने स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत हायवा मध्ये बसलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत तो हायवा पळून नेल्याची घटना चकलांबा फाट्याजवळ घडली याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री कारवाईसाठी गेले होते. या वेळी राक्षसभुवनकडून उमापूरकडे तीन हायवा वाळू घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . त्यांनी उमापूर फाट्याजवळ तिनही हायवा ताब्यात घेतले. हायवा (क्र. एम.एच. १२ एन.एक्स. ९५९७) याच्यावर कारवाईसाठी चकलांबा पोलिस ठाण्यात पाठवला. या वेळी सोबत तीन कर्मचारी होते. हायवा चकलांबा फाट्याजवळ पोहचल्यानंतर पाठीमागून हायवाचा मालक युवराज उत्तम कठाळे (वय ३८, रा. दहिवंडी ता. शिरूर) यासह अन्य चार जण स्कॉर्पिओमध्ये आले व स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. २३ वाय. १७९५) आडवी लावून आतमध्ये असलेल्या पोलिसांना दमदाटी करत धक्काबुक्की केली व हायवा घेऊन पळ काढला. पाठीमागे असलेले दोन हायवा घेऊन पथकप्रमुख आनंद कांगुणे आणि अन्य एक कर्मचारी तेथे आले व मात्र तोपर्यंत ते फरार झाले होते. रात्री ताब्यात घेतलेल्या हायवामध्ये एम.एच. २० डी. ई ३११५, दुसरी एम.एच. १६ सी.सी. ५३७९ या दोन गाड्या चकलांबा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पाठवल्या तर हायवा क्र. एम.एच. १२ एन.एक्स. ९५९७ या गाडीचा मालक युवराज उत्तम कठाळे व चालक बाळु मोरे सह अन्य चौघांवर चकलांबा पोलिस ठाण्यात पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३, ३४१, ३३२, ३७९, २६९, २७०, १४३, १४९, ५०६, १८८ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख आनंद कांगुणे, पो.ना. झुंबर गर्जे, संतोष हंगे, गोविंद काळे, अन्वर शेख गहिनीनाथ गर्जे यांनी केली. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close