क्राईम

चिंचोली माळीत 92 हजाराचा गुटखा पकडला

बीड — आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे 26 जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत 92 हजाराचा गुटखा पकडला.या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात सर्रास खुलेआम विक्री होत असून गुटखा माफिया विरोधात
आयपीएस पंकज कुमात यांच्या पथकाने आघाडी उघडली आहे. चिंचोलीमाळी येथे गुटखा विक्री होत. असल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आपले पथक त्या ठिकाणी पाठवत कारवाई केली. यावेळी आकाश इंगळे रा.कळंब, धनराज चंदनशिव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 92 हजाराचा गुटखा जप्त केला. त्यांनी तो गुटखा कोठून आणला याचा पोलिस तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, पंकज कुमावत यांच्यामार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर,रामहरी भंडाणे, संजय टुले, विकास चोपणे यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button