आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात 230 कोरोना रुग्णांची भर

बीड — जिल्ह्यात आज 230 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. बीडमध्ये सर्वाधिक 163 रूग्ण सापडले आहेत. तर 80 रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बीड शहरात व्यापाऱ्यांची अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 137 रुग्ण सापडले होते. त्यात आणखी 26 रुग्णांची भर पडली त्यामुळे बीडचा रुग्णांचा आकडा 163 वर जाऊन पोहोचला आहे ‌ अंबाजोगाई मध्ये 15 रुग्ण धारूर मध्ये तीन, गेवराई मध्ये तीन, केज मध्ये तेरा रुग्ण सापडले आहेत. माजलगाव मध्ये सात , परळीत 15, आष्टी मध्ये आठ तर शिरूर मध्ये तीन रुग्ण नव्याने सापडले. वडवणी आणि पाटोदा तालुक्यात मात्र एकही रुग्ण सापडला नाही. हे रुग्ण कुठल्या भागात सापडले याची माहिती प्रशासनाने रात्री सव्वा बारापर्यंत दिली नव्हती. ही माहिती पहाटेच्या सुमारास उपलब्ध होण्याची शक्यता आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close