आपला जिल्हा

Antigen test: तिसऱ्या दिवशी बीडमध्ये सापडले 131 कोरोना रुग्ण

बीड — शहरातील सहा केंद्रावर सहा केंद्रावर आज तिसऱ्या दिवशीही ही 2665 व्यापारी,कामगारांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 131 कोरोना बाधित आढळून आले आहेत. टेस्ट च्या पहिल्या दिवशी 8 आॅगस्ट रोजी 86, नऊ ऑगस्ट रोजी 137 तर तिसऱ्या दिवशी 131 रुग्ण सापडल्यामुळे ही संख्या आता 354 वर जाऊन पोहोचली आहे.


जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी व्यापाऱ्यांची अॅन्टिजन टेस्ट तीन दिवस करण्यात आली. तीन दिवसांमध्ये 8436 जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये 354 रुग्ण सापडले. या टेस्ट च्या तिसऱ्या दिवशी बलभीम कॉलेजमधील सेंटरमध्ये 405 जणांची टेस्ट घेण्यात आली त्यात तेहतीस रुग्ण सापडले, वैष्णोदेवी पॅलेसमध्ये 492 जनांच्या तपासणीत 33, अशोक नगर शाळेमध्ये 488 टेस्ट करण्यात आली. यामध्ये 18 रुग्ण सापडले. राजस्थानी विद्यालयातील केंद्रावर 443 जणांची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये देखील 18 रुग्ण सापडले. चंपावती शाळेतील बूथ क्रमांक 1 मध्ये 387 जणांच्या तपासणीत 14 तर बूथ क्रमांक दोन मध्ये 450 जणांच्या तपासणीत 15 रुग्ण सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close