क्राईम

🇮🇳 कंटेनर ची ॲपे रिक्षाला धडक एक ठार, दोन जखमी 🇮🇳

बीड — मांजरसुंबा येथून बीडच्या दिशेने येत असलेल्या मालवाहतूक आप्पे रिक्षाला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी दि.२६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बीड-मांजरसुंबा रस्त्यावर कोळवाडी फाट्यावर घडली. धडक देऊन चालकाने कंटेनर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु बीड ग्रामीण पोलीसांना पाठलाग करुन सदरील कंटेनर पाडळसिंगी जवळ पकडून ताब्यात घेतला.

या अपघातातील मयत गंगुबाई रोकडे वय ४० वर्ष रा. प्रकाश आंबेडकर नगर (गांधी नगर), बीड या भागातील असून, त्या भंगार गोळा करून उपजीविका भागवितात. गुरुवारी दि. २६ जानेवारी रोजी त्या अन्य दोन महिलांसह मालवाहतूक आप्पे रिक्षा क्र. एम. एच. २० एस टी २०५७ मध्ये भंगार गोळा करुन मांजरसुंबा कडून बीड शहराकडे येत होत्या. दरम्यान कोळवाडी फाट्याजवळ आले असता आप्पे रिक्षाला कंटनरने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचे दोन तुकडे झाले. यामध्ये गंगुबाई रोकडे या ठार झाल्या अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. धडक देऊन कंटेनर चालकाने कंटेनर सह घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु बीड ग्रामीण पोलीस वेळीच घटनास्थळी उपस्थित झाले व त्यांनी कंटेनरचा पाठलाग करुन कंटेनर क्र. आर. जे. २७ जी सी ३६९५ पाडळसिंगी जवळ पकडून ताब्यात घेतला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button