क्राईम

🇮🇳 हॉटेलमध्ये विक्रीस ठेवलेला 25 किलो गांजा पोलिसांनी पकडला 🇮🇳

गेवराई — एका हॉटेलमध्ये विक्रीसाठी आणण्यात आलेला 25 किलो गांजा पोलिसांनी पकडला ही कारवाई गेवराई शहराजवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेवराई पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांना बाह्यवळण रस्त्याजवळच्या हॉटेलमध्ये २५ किलो गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. यावरून बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने तात्काळ हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता २५ किलो गांजा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गौसखान अमनउल्ला खान वय ४५ वर्ष, रा.गेवराई याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button