आपला जिल्हा

रविवारी बीड जिल्ह्याचा पडले 233 कोरोना रुग्ण

बीड — रोज कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. दरम्यान वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील सहा शहर 12 ऑगस्टपासून दहा दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. रविवारी जिल्ह्यात 3855 संशयितांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 3622 संशयितांचे अहवाल निगेटिव आले. तर 233 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

बीड शहरात 163 रूग्ण सापडले आहेत. अंबाजोगाई मध्ये दहा रुग्ण, आष्टी मध्ये सहा रुग्ण, धारूर मध्ये दोन रुग्ण, गेवराई मध्ये दहा रुग्ण, केसमध्ये सात, माजलगाव मधील सात, परळी मध्ये 22, पाटोदा मध्ये दोन, शिरूर मध्ये तीन, वडवणीत एक रुग्ण सापडला आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकही तालुका निरंक सापडला नाही. प्रत्येक तालुक्यात रुग्ण सापडल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनतेला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले व संयम बाळगला तर कोरोनाची साखळी तोडणे सहज शक्य होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close