आपला जिल्हा

अॅन्टीजन टेस्टमध्ये बीडमध्ये आज सापडले 137 विक्रमी रुग्ण

बीड — जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमण प्रचंड वाढल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दोन दिवसापासून बीड शहरात अॅन्टीजन टेस्ट सुरू असून व्यापारीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत तितक्याच मोठ्या प्रमाणावर रुग्ण सुद्धा नव्याने सापडत आहेत आज बीडमध्ये 137 विक्रमी रुग्ण सापडले आहेत


जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व्यापाऱ्यांची अॅन्टिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला परिणामी कोरोनाची साखळी तोडणे आरोग्य विभागाला काही प्रमाणात सोपे जाणार आहे. आज दिवसभरात 3170 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या.त्यात बलभीम केंद्रावर 540 पैकी17 पॉझिटिव्ह, वैष्णवीमध्ये 460 पैकी 16, अशोक नगर शाळेत 624 पैकी 31, राजस्थानी विद्यालय 556 पैकी 31, चंपावती बुथ 1 वर 512 पैकी 22, चंपावती बुथ 2 वर 478 पैकी 20 पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
कालही अ‍ॅन्टीजन टेस्टच्या तपासणीत 86 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर आजच्या टेस्टमध्ये 137 असे मिळून 223 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close