कृषी व व्यापार

🇮🇳 चौसाळा: शेतकऱ्यांच्या पैशावर डीसीसी बँकेचा दरोडा? 🇮🇳

बीड — सध्या घोटाळ्यामुळे गाजत असलेल्या चौसाळ्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांचे जमा झालेले पीक विम्याचे पैसे मिळणं आता दुरापास्त झालं आहे. एटीएम वरून पैसे निघत नसल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा घातला की काय? अशी शंका व्यक्त करत शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पिक विमा कंपनीने तोडकीमोडकी का होईना मदत केली होती. ती मदत डीसीसीच्या चौसाळा शाखेत जमा झाली. पैसे जमा होताच काही शेतकऱ्यांनी एटीएम द्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केले असता एकावेळी फक्त पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडावेत, जास्त पैसे काढता येऊ नयेत यासाठी मर्यादा कमी केली. त्यानंतर घोटाळ्यांची मालिका उघडकीस आल्यानंतर शाखाधिकार्‍यासहित तीन जण निलंबित करण्यात आले. चौसाळा शाखा नेहमीच घोटाळ्यांसाठी प्रसिद्ध राहिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या बँकेने गमावला आहे. आता त्यातच शेतकऱ्यांना एटीएम द्वारे पैसे काढणं अवघड झालं आहे. शाखेत पैसा नसल्यामुळे रोख पैसे काढणे अवघड झाला आहे. आता एटीएम वरून देखील व्यवहार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशावर पुन्हा दरोडा टाकला गेला की काय? अशी शंका शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना दुसरीकडे बँकेच्या या दरिद्री कारभारामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना एटीएम द्वारे पैसा मिळणार की नाही? त्यांचा पैसा बँकेत सुरक्षित आहे की नाही? याबद्दल शेतकऱ्यांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. हजारो रुपयांचा दरोडा घातला गेला असल्यास पुढे आपलं कसं होणार यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button