आपला जिल्हा

जिल्ह्यातील माजलगाव शहर देखील 12 तारखेला लॉक डाऊन

बीड — जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी िल्हाधिकार्‍यांनी पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. आता बीड परळी अंबाजोगाई आष्टी आणि केज पाठोपाठ माजलगाव शहर देखील 12 ते 21 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
कोरोना ची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लाॅक डाऊन चा वापर करत सुरुवातीला जिल्ह्यातील पाच शहर “बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले यामध्ये बीड परळी अंबाजोगाई आष्टी आणि केज यांचा समावेश होता. मात्र काही कालावधी नंतरच पुन्हा नव्याने वेगळा आदेश काढला‌ माजलगाव शहर देखील 12 ते 21 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

फक्त या सेवा राहणार सुरू —
दि. 12 ते 21आॅगस्ट या कालावधीत पाचही शहरांमध्ये सकाळी सात ते नऊ पर्यंत घरपोच दूध विक्री करता येणार आहे
घरगुती गॅस सिलेंडर सेवा सुरु राहणार एजन्सी धारकांनी एजन्सीचा गणवेश परिधान करावा व सोबत ओळखपत्र बाळगावे.

खासगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी सलग्न औषधी दुकाने सुरु राहतील. (सबब सर्वांनी त्यांना लागणारी औषधे दि.11 ऑगस्ट पर्यंत खरेदी करुन घ्यावीत).

जार वॉटर सप्लायर्स यांनी ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामध्ये कोव्हिड 19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करुन पाणी द्यावे.तसेच सर्व जार वाटर सप्लायर्स कर्मचार्‍यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.

मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांनी नियमानुसार पास काढून सेवा पुरवावी.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close