आपला जिल्हा

अॅन्टीजन टेस्टमध्ये बीडमध्ये दुपारपर्यंत सापडले 62 रुग्ण

बीड — कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी शनिवारपासून बीड शहरात सहा केंद्रावर अँटीजेन तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी, व्यवसायिक, त्यांचे कर्मचारी, दूध, फळभाजी विक्रेते येत आहेत. आज दुपारी एक वाजेपर्यंत सहा केंद्रांवर १ हजार ४६४ जणांच्या अँटीजेन तपासण्या झाल्या असून यामध्ये ६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 


बीड शहरात अँटीजेन तपासणीला सुरुवात झाली आहे. अँटीजेन तपासणीच्या पहिल्याच दिवशी २ हजार ६०१ जणांच्या तपासण्या होऊन त्यामध्ये तब्बल ८६ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर समुहसंसर्ग झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. आज सकाळपासून बीड शहरातील सहाही केंद्रांवर अँटीजेन तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. व्यापारी, व्यवसायिक, त्यांचे कर्मचारी, फळभाजी, दूध विक्रेते केंद्रावर पोहचले. बलभिम कॉलेजच्या केंद्रावर २६० व्यक्तींची तपासणी केली. त्यामध्ये ९ व्यक्ती बाधीत आढळले. वैष्णो पॅलेसमध्ये तपासलेल्या १८४ व्यक्तींमध्ये ९ जण बाधीत निघाले. अशोक नगर येथील जि.प.शाळेमध्ये तपासलेल्या ३३० मध्ये १२जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राजस्थानी विद्यालय केंद्र २३९ चाचण्यांमधून १४ जण पॉझिटिव्ह, चंपावती माध्यमिक विद्यालयामध्ये २०० व्यक्तींची तपासणी केली असून त्यामध्ये ९ जण बाधीत असल्याचे उघडकीस आले आहे. तर चंपावती प्राथमिक शाळेतील दुसर्‍या बुथवर २५१ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यामध्ये ९ जण कोरोना बाधीत आढळून आले आले असून दुपारी १ वाजेपर्यंत १ हजार  ४६४ जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये ६२ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close