आपला जिल्हा

बीड जिल्ह्यातील पाच शहर पुन्हा लॉक डाऊन

बीड — जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी दुपारी 12 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दहा दिवसाच्या कालावधीत बीड परळी अंबाजोगाई आष्टी आणि केज ही 5 शहर बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत
या नव्या आदेशानुसार पाचही शहरांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. वैद्यकीय गरजे शिवाय इतर बाबींसाठी घराच्या बाहेर कोणालाही पडता येणार नाही. शहरातून बाहेर जाण्यासाठी किंवा शहरात येण्यासाठी ई पास ची आवश्यकता लागणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नागरिकांना भासू नये यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी अद्याप एंटीजन टेस्ट केली नाही अशा दुकानदारांना देखील दुकान उघडे ठेवण्याची परवानगी परंतु दिलेल्या वेळेत टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. 21 ऑगस्ट नंतर शहरांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी विविध प्रकारची दुकाने वेगवेगळ्या दिनांकास सुरू करण्याची परवानगी देण्यात. ज्या कोरोना बाधित रुग्णांना कोणतेही लक्षण नाही त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या घरीच काही अटींवर विलगीकरण करण्यात येणार आहे.
फक्त या सेवा राहणार सुरू —
दि. 12 ते 21आॅगस्ट या कालावधीत पाचही शहरांमध्ये सकाळी सात ते नऊ पर्यंत घरपोच दूध विक्री करता येणार आहे
■ घरगुती गॅस सिलेंडर सेवा सुरु राहणार एजन्सी धारकांनी एजन्सीचा गणवेश परिधान करावा व सोबत ओळखपत्र बाळगावे.

खासगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी सलग्न औषधी दुकाने सुरु राहतील. (सबब सर्वांनी त्यांना लागणारी औषधे दि.11 ऑगस्ट पर्यंत खरेदी करुन घ्यावीत).

जार वॉटर सप्लायर्स यांनी ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामध्ये कोव्हिड 19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करुन पाणी द्यावे.तसेच सर्व जार वाटर सप्लायर्स कर्मचार्‍यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी.

मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांनी नियमानुसार पास काढून सेवा पुरवावी. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close