ताज्या घडामोडी
पॉलिसी धारकाचा क्लेम नाकारणार्या स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

बीड — पॉलीसी धारकास -19 सदृश्य लक्षणाच्या उपचारानंतर झालेल्या खर्चाची रक्कम नाकारणार्या स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, बीड यांनी आदेश बजावत मेडीकल बिलाबाबत 65 हजार 145 रक्कम व मानसिक व शारिरीक त्रासापोटी 3 हजार व तक्रारीचा खर्च 2 हजार रुपये देण्यास निकाल मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत देण्याचे बजावले आहे याबाबत सदरील तक्रारदार यांच्यातर्फे अॅड.बालाप्रसाद सारडा यांनी काम पाहिले.
याबाबत माहिती अशी की, बीड येथील पॉलिसीधारकाला स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड कार्यालय, बीड या आरोग्य विम्याच्या कंपनीकडून आरोग्याचा विमा काढून देण्यात आला होता त्यामध्ये रुग्णाच्या उपचारासाठीचा आरोग्यविषयक खर्च कंपनी देईल असे असतांना सदरील तक्रारदाराला कोव्हीड-19 ची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांनी अंबाजोगाई येथे उपचार घेतला त्यानंतर त्याचा कोव्हीड रिपोर्ट निगेटिव्ह आला परंतू डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी राहण्यास सांगितले होते यानंतर तक्रारदाराने सदरील इन्शुरन्स कंपनीकडे दवाखान्यातील बिले व इतर खर्च याबाबत सर्व कागदपत्रे जमा करत क्लेम रक्कमेची मागणी केली होती परंतू सदरील मागणी ही विमा कंपनीने पॉलिसीधारकाचा विमा क्लेम फेटाळून लावला होता. त्यानंतर तक्रारदाराने बरेच दिवस विनंती अर्जाद्वारे कंपनीकडे मागणी केली परंतू कंपनीने कसलीही दखल न घेतल्याने तक्रारदाराने अॅड.बालाप्रसाद सारडा यांच्या मार्फत मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे तक्रार क्र.163/2022 ने तक्रार दाखल केली व यावेळी अॅड.बालाप्रसाद सारडा यांनी आयोगास सर्व कागदपत्रे दाखवून विमा मिळण्यासाठी योग्य युक्तीवाद करतांना आय.आर.डी.ए.चा आदेश मा.न्यायालयात दाखल केला व सदरील आदेशामध्ये रुग्णाचा पॉलिसीमध्ये कोव्हीड-19 बद्दल उल्लेख नसला तरी विमा कंपनीला रुग्णाचा क्लेम नाकारता येणार नाही असे सांगितले आहे त्यानंतर मा.कोर्टाने सर्व कागदपत्राची पाहणी करुन विमा कंपनीला तक्रारदाराला दवाखान्याचे संपुर्ण बिल 65 हजार 145 रुपये व मानसिक व शारिरीक त्रासापोटी 3 हजार रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.2 हजार निकाल मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत देण्याचे बजावले आहे.