क्राईम

टिप्परच्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे जागीच ठार

अंबाजोगाई– वाळूच्या भरधाव टिप्पणी मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काळवीट तांड्या जवळ शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

अंबाजोगाई — पठाण मांडावा रोडवर असलेल्या काळवीट तांडा परिसरात वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परने क्र. MH -25 U 2444 आणि मोटारसायकलला क्र. MH-13 BD 5684 जोराची धडक दिल्यामुळे मोटार सायकल वरील तिघेजण जागीच ठार झाले.पप्पू महादेव गायक(वय ३७ वर्षे),पप्पू जणार्धन गायके(वय ३०वर्षे),विट्ठल मुंजा गायके(वय२३वर्षे ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून परळी तालुक्यातील वसवाडी वानटाकळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close