क्राईम
पाण्याच्या हिटर चा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू !

केज – पाणी गरम करत असताना हीटर चा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव येथे बुधवार दि. 25 जानेवारी रोजी पहाटे चार वाजता घडली.
ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे व इंदुबाई ज्ञानेश्वर सुरवसे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाणी गरम करण्यासाठी हीटर चालू करत असताना शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस नाईक उमेश आघाव, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे घटनास्थळी दाखल झाले आहेत. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचा मृत्यू कशामुळे झाला हे निश्चित होणार आहे.