क्राईम

माजलगाव मध्ये 36 लाख रुपयाचा गुटखा जप्त

बीड — विभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने माजलगाव शहरात मध्यरात्री केलेल्या कारवाईत 36 लाख 21 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

माजलगाव विभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरकुमार बच्चू यांना सुनील आश्रुबा कदम यांच्या राहत्या घरी गुटखा विक्रीसाठी मालाची साठवणूक केली असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी आपल्या पथकासह शुक्रवार (दि. 20) रोजी रात्री 11 वाजता सुनील आश्रुबा कदम यांच्या राहत्या घराची तपासणी केली असता त्यात तब्बल 2 लाख 13 हजार 667 रुपयांचा गुटखा मिळून आला. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी सुनील कदम याची चौकशी केली असता सदर माल कोठून आणला असे विचारले असता त्याने मैंदा येथून बाळू घुमरे यांच्या आखाड्यावरून श्रीधर रवींद्र ठोंबरे यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. रात्रीतून तपास वेगाने फिरवत शनिवार (दि.21) रोजी रात्री 2 वाजता बाळू घुमरे यांच्या आखाड्याची झडती घेतली असता 34 लाख 7 हजार 600 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. माजलगावचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर शंकरराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सुनील आश्रुबा कदम, श्रीधर रवींद्र ठोंबरे व बाळू घुबरे यांच्यावर भादवी कलम 328, 188, 272, 273 24 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button