आपला जिल्हा

अ‍ॅन्टीजेन टेस्ट मध्ये पहिल्याच दिवशी आढळले 86 रुग्ण

बीड — बीड शहर पूर्णपणे कोरोना च्या विळख्यात सापडल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले. गेवराई नंतर बीड शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व ही साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भिलवाडा पॅटर्न राबवत व्यापाऱ्यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट केली. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी 86 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले.
बीड शहरात आज सहा केंद्रावर 2601 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. यामध्ये 86 जण कोरोना संक्रमित असल्याचे अ‍ॅन्टीजेन टेस्ट मध्ये उघडकीस आले.यामध्ये बलभीम महाविद्यालयात केलेल्या तपासणीत 342 पैकी 11 पॉझिटिव्ह, मॉ वैष्णवी पॅलेस 396 पैकी 9 पॉझिटिव्ह, जिल्हा परिषद शाळा अशोकनगर येथे 384 पैकी 16 पॉझिटिव्ह, राजस्थानी विद्यालयात 551 पैकी 20 पॉझिटिव्ह, चंपावती प्रायमरी स्कूल बुथ 1 वर 455 पैकी 11 पॉझिटिव्ह, चंपावती बुथ क्र 2 वर 473 पैकी 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1468 झाली आहे. अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये जे कोरोना पॉझिटिव आढळून आले त्यांना आरोग्य विभागाने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close