बीडकराच्या प्रतापाने चौसाळा डीसीसीत घोटाळ्यांच सत्र सुरूच; बीडकर, कुडके, जोगदंड निलंबित

बीड — चौसाळा डीसीसी शाखेत घोटाळ्यांची मालिका सुरूच असून नवनवीन प्रकरण उघडकीस येऊ लागली आहेत. कानडीघाटच्या मयत ग्यानबा झोडगे यांच्या खात्यातून एक लाख रुपये गायब झाल्यानंतर धोंडीबा सर्जेराव कुडके यांच्या खात्यावरील 62 हजार 450 रूपये परस्पर काढण्यात आले असून ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जमा रक्कम उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान गोलंग्री येथील महात्मा फुले कर्जमुक्ती गैरव्यवहार प्रकरणी शाखाधिकारी प्रताप बिडकर, तपासणीस ज्ञानोबा जोगदंड, रोखपाल प्रताप कुडके या तिघांना निलंबित करण्यात आले आहे
बीड तालुक्यातील मौजे. कानडीघाट येथील शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांचा दि.2 सप्टेंबर 2019 रोजी मृत्यु झाला असून त्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत खाते क्रमांक 001311002010753 असून त्या खात्यावरील त्यांच्या मृत्यूनंतर दि.11 ऑक्टोबर 2019 ,200 रूपये, दि.14 नोव्हेंबर 2019 ,200 रूपये, दि.23 डिसेंबर 2019 रोजी 16हजार,दि.4 मार्च 2020 रोजी 700 रूपये,दि 05 मे 2020 रोजी 5700 रूपये,दि.20 ऑगस्ट 2020 रोजी 2000 रूपये,दि.31 डिसेंबर 2020 रोजी 2000 रूपये,दि.15 मार्च 2021 रोजी 3400 रूपये दि.19 मे 2021 रोजी 2000 रूपये,दि.17 ऑगस्ट 2021 रोजी 2000 रूपये,दि.4 जानेवारी 2022 रोजी 200 रूपये,दि.12 जानेवारी 2022 रोजी 14 ,350 रूपये,दि.4 जुन 2022 रोजी2008 रूपये एकुण 62 हजार 450 रूपये परस्पर खात्यातमधुन उचलण्यात आले आहेत. दरम्यान गोलंग्री ता.जि.बीड येथील शेतक-यांचे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति प्रोत्साहन पर अनुदान योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीचे आदेश दिले होते काल दि.19 जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली असून चौसाळा शाखेतील ३ जणांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये प्रताप बीडकर, तपासणीस ज्ञानोबा जोगदंड, रोखपाल प्रल्हाद कुडके या तिघांचा समावेश आहे.बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत आधिकारी-कर्मचारी आणि दलाल यांचे रॅकेट कार्यरत असुन अडाणी शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत त्यामुळेच संबधित प्रकरणात (S.I.T.) मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.