क्राईम

मांजरसुंबा घाटात व्यापाऱ्यास लुटणाऱी दरोडेखोरांची टोळी बारा तासात जेरबंद

बीड — सोलापूरकडे निघालेल्या व्यापाऱ्याला 5 दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून मांजरसुंबा घाटामध्ये लुटले होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवून अवघ्या बारा तासांच्या आत पाच दरोडेखोरांना जेरबंद केले.

            बुलढाणा जिल्ह्यातील सय्यद एजाज सय्यद पाशा हे सोलापूरकडे पिकअपद्वारे द्राक्षे आणण्यासाठी जात होते.19 जानेवारी रोजी त्यांच्या पिकअपला पालीच्या घाटात दरोडेखोरांनी गाडी आडवी लावून चाकुचा धाक दाखवत लुटले होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला. यामध्ये समाधान बाबुराव खिंडकर रा. बेलवाडी, अविनाश भास्कर धाडे रा. तिसगाव वाडी ह.मु. पिंपळनेर, स्वप्नील महादेव वरपे रा. शिवाजीनगर, लिंबाजी जगन्नाथ वरपे रा. पिंपळनेर, शिवराज कल्याण गायकवाड रा. नाळवंडी नाका, बीड या पाच जणांना जेरबंद करण्यात आले. येथून अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सतीश वाघ, भगतसिंग दुल्लत, रामदास तांदळे, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, अश्विनकुमार सुरवसे, अशोक कदम यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button