हिंगणीच्या “श्रीकांत”च क्रांतीकारी पाऊल;जैविक ऊस उत्पादनातून नैसर्गिक गुळ निर्मिती शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार!

बीड — शेतीत बेसुमार रसायनांचा वापर केल्यामुळे वाढत्या रोगराईचं प्रमाण चिंतेची बाब बनली आहे. परिणामी पुन्हा जैविक शेतीची चर्चा सुरू असतानाच हिंगणीच्या श्रीकांत कुलकर्णी या तरूणाने जैविक ऊस उत्पादनातून नैसर्गिक गुळ निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. संपूर्ण नैसर्गिक आहे म्हणून गुळाला चांगला बाजार भाव मिळाला तर हे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक पाऊल ठरणार आहे.
् शेतीत होत असलेल्या वारेमाप रसायनांच्या वापरामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा सोबतच शरीरात होणा-या रक्ताच्या (एनेमिया) कमतरतेसह इतर आजारामुळे मानवी आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे रसायनमुक्त जैविक शेतीची चर्चा जोर धरू लागली आहे. अशावेळी बीड तालुक्यातील हिंगणी बुद्रुक या ठिकाणचे तंत्रशिक्षणाचे पदवीधर असलेल्या श्रीकांत अविनाश कुलकर्णी या तरुणाने जैविक शेती करत ऊस उत्पादन घेतले.
मजूरांची टंचाई भेडसावत असताना नैसर्गिक गुळ निर्मिती प्रकल्प सुरू केला. ऊस उत्पादन घेत
असताना कुठल्याही रासायनिक तणनाशकांची फवारणी केली नाही अथवा रासायनिक खतांचा देखील वापर केला नाही.हा प्रयोग देखील अनोखा होता.ऊस पिकासाठी शेणखत गांडूळ खत वापरण्यात आलं. तन नियंत्रणासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने अंतर मशागत व खुरपणी करण्यात आली. कष्टाला फळ मिळतच ऊसाचं पीक देखील जोमदार आलं. पण जैविक उत्पादन तर घेतल पण कारखान्याला ऊस दिला तर काहीच उपयोग होणार
नाही.याची चिंता भेडसावू लागली.गुळ निर्मिती करायची तर मजुरांची टंचाई हा प्रश्न मोठाच होता. सोबतच भांडवल देखील लागतं.पण या सर्व गोष्टीवर मात करताना त्यांचे वडील अविनाश विष्णुपंत कुलकर्णी पदवीधर असलेले चुलते अजित कुलकर्णी व अभियंते आनंद कुलकर्णी यांनी
मोलाची साथ देत नैसर्गिक गुळ निर्मिती प्रकल्प सुरू केला. गुळ निर्मिती करत असताना देखील कुठल्याही रसायनाचा वापर केला जात नाही. रानभेंडी, एरंडी वापरून ही गुळ निर्मिती केली जाते. अर्धा किलो, एक किलो, पाच किलो दहा किलो च्या ढेपेची निर्मिती करण्यात येत आहे.जैविक ऊस उत्पादनासोबत नैसर्गिक गुळ निर्मिती केली असली तरी त्याला चांगली बाजारपेठ मिळणं आवश्यक आहे.काही सुजाण व्यापाऱ्यांकडून गुळाची मागणी होऊ लागली आहे. व्यापाऱ्यांकडून काकवीची मागणी झाल्यास काकवी (पाक) उत्पादन सुद्धा करण्याचा श्रीकांतचा विचार आहे.व्यापारी वर्गाने गुळाला चांगली किंमत दिली तर श्रीकांत कुलकर्णीच्या या अनोख्या प्रयोगाची प्रेरणा मिळून अनेक तरुणांची पावलं नैसर्गिक शेती उत्पादन व प्रक्रिया उद्योगाकडे वळणार आहेत.याबरोबरच ग्राहकांना सशक्त आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी उपयोगी ठरणारे आहे.
इतर उत्पादक नैसर्गिक गुळाची खात्री देत असले तरी ऊस उत्पादनासाठी रासायनिक खत व तण नाशकांचा वापर केला जातो. आम्ही मात्र जैविक उसापासून नैसर्गिक पद्धतीने गुळ निर्मिती करत आहोत.कांही व्यापाऱ्यांनी जैविक नैसर्गिक गुळाची मागणी केली आहे.कोणत्याही व्यापाऱ्यास शंका असल्यास त्यांनी स्वतः येऊन उत्पादनात रासायनिक अंश आढळतो का? याची चाचणी व खात्री करावी अस आवाहन करत . याबरोबरच या गुळाची व काकवीची ऑर्डर देण्यासाठी व्यापाऱ्यांनी ग्राहकांनी 98 50 36 36 23 व 97 64 18 37 47 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
श्रीकांत कुलकर्णी
शेतकरी, हिंगणी बु.
ता. जि. बीड