देश विदेश

केरळच्या कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात वैमानिकासह 14 ठार

कोझिकोड — केरळच्या कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर उतरत असताना रणवेवरून घसरल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात वैमानिकासह 14 जण ठार 123 जण जखमी झाले आहेत यात पंधरा जणांची प्रकृती गंभीर आहे.झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानात 170 प्रवासी होते.


वंदे भारत मिशन अंतर्गत IX1344 हे एअर इंडियाचे विमान दुबई येथून भारतात आले होते. केरळमधील कोझिकोड विमानतळावर धावपट्टीवर उतरत होतं.यावेळी येथे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हे विमान धावपट्टी वरून घसरल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट असल्यामुळे धावपट्टीवर काळजीपूर्वक विमान उतरवावं लागतं. रणवे वरून घसरल्यामुळे विमान 30 फूट खोल दरीत जाऊन कोसळल्यामुळे त्याचे दोन तुकडे झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात वैमानिकासह 14 जण ठार झाले असून 123 जण जखमी झाले
आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close