कृषी व व्यापार

आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांना मोफत वीज!

अमरावती — महाराष्ट्राच्या आंध्र प्रदेश राज्य सरकार कृषी क्षेत्राला नऊ तास मोफत वीजपुरवठा व्हावा यासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांना सौर उर्जेच्या पुरवठ्यासाठी एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत राज्य सरकार करार करणार आहे.

या करारामुळे सप्टेंबर 2024 पासून राज्यात 3 हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानंतर 2025 आणि 2026 पासून अनुक्रमे 3 हजार आणि 1 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मित करणार आहोत, अशी माहिती आंध्रप्रदेशचे ऊर्जामंत्री पेड्डीरेड्डी रामचंद्र रेड्डी यांनी सोमवारी दिली. यावेळी आंध्रप्रदेशचे विशेष मुख्य सचिव के विजयानंद उपस्थित होते.शेती व्यवसाय सक्षम आणि फायदेशीर करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकार प्रयत्न करत असल्याचेही रेड्डी म्हणाले. तसेच राज्य सरकार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 2.49 रुपये युनिट दराने 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा खरेदी करून पुढील 25 वर्षे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याची हमी देत आहे.
भविष्यातही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत सरकार वचनबद्ध आहे. तसेच जलसंवर्धन क्षेत्राला अनुदानित किमतीत वीजपुरवठा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही ऊर्जा मंत्री रेड्डी यांनी दिली.के. विजयानंद म्हणाले, “कृषी क्षेत्राला वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार कृषीपंप जोडणी आणि स्मार्ट मीटर बसवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा करत आहे. शेतकऱ्यांना वीज पुरवण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी 8 हजार 400 कोटी रुपयांच्या अनुदानचे ओझे उचलत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button