महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

केज — गेल्या दोन वर्षापासून वीज जोडणी मिळत नसल्यामुळे महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून महावितरण कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रकार केज मध्ये घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी धनराज सदाशिव घुले वय 35 वर्ष यांनी शेतीसाठी वीज जोडणी मिळावी यासाठी केजच्या महावितरण कार्यालयात रितसर अर्ज केला. यानंतर कोटेशनही भरलं याला दोन वर्ष झाली.तरीही दोन वर्षांपासून वीज जोडून दिली नाही. यामुळे वैतागून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कार्यालयात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान शेतकरी धनराज घुले यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताच सेवेवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून शेतकऱ्यास पकडले यामुळे पुढील अनर्थ टळला